Just another WordPress site

ही अभिनेत्री चक्क बॉयफ्रेंड आणि वडिलांसोबत गेली व्हॅकेशनवर

विमानतळावरचा तो व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्रीचा बाॅयफ्रेंड आहे माजी मुख्यमंत्र्याचा नातू

मुंबई दि १(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या जान्हवी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाला डेटिंग करत आहे. शिखर पहाडियासोबत ती रिलेशनमध्ये आहे. ती शिखर आणि आपले वडील बोनी कपूरबरोबर
व्हेकेशनवर गेली आहे.

GIF Advt


जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती वडील बोनी कपूर व शिखर या दोन्हींबरोबर दिसत आहे. ‘विरल भयानी’ नावाच्या एका पेजवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये जान्हवीबरोबर बोनी कपूर व शिखर दोघेही दिसत आहेत. त्यामुळे हे सर्वजण एकत्र फिरायला गेल्याची चर्चा आहे. मुंबई विमानतळावर हे तिघेही स्पॉट झाले. आधी जान्हवी, नंतर बोनी कपूर व त्यांच्या पाठोपाठ शिखर दिसला. जान्हवीचे कुटुंबीय आणि तिची जवळची मैत्रिण तनिषा संतोषी त्यांच्यासोबत सुट्टीला अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत सहभागी झाली होती. तसेच अनेकवेळा कारमधून जाताना आणि पार्ट्यांना जाताना या दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे.

जान्हवीने धडक सिनेमाबरोबर बाॅलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ती अखेरची ‘मिली’ या चित्रपटात दिसली हाेती. यासाेबतच तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बाेलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच ‘बावल’ आणि ‘मिस्टर अॅन्ड मिसेज माही’मध्ये दिसणार आहे. दरम्यान वडिलांनी जान्हवी आणि शिखरच्या नात्याला मंजुरी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!