
ही अभिनेत्री लवकरच या क्रिकेटपटूसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत
अभिनेत्रीच्या वडिलांचे सुचक विधान, पहा कधी करणार लग्न
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल बऱ्याच काळपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या लग्नाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.आता या दोघांच्या लग्नाच्या चर्चांवर अथियाचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे चाहते पुन्हा एकदा उत्सुक झाले आहेत. चाहते आता तारखेची प्रतीक्षा करत आहेत.
सुनील शेट्टीने अलिकडेच क्राइम थ्रीलर वेब सीरिज ‘धारावी बँक’च्या लॉन्चसाठी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सुनील शेट्टीला लेक अथियाच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना सुनील शेट्टीने अथिया आणि राहुल लग्न करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अथिया- राहुल यांच लवकरच लग्न होईल असे सुनिल शेट्टी म्हणाले आहेत. त्यांचे विधान यासाठी महत्वाचे आहे की मागे सुनिल शेट्टीला हाच प्रश्न विचारला होता त्यावेळी , “मुलांना कधी लग्न करायचं हे ते स्वतःच ठरवतील.” अशी प्रतिक्रिया दिली होती.पण आता लवकरच लग्न करतील असे सांगितल्यामुळे चाहत्यांना आता आथिया आणि राहुलच्या लग्नाच्या तारखेची प्रतिक्षा असणार आहे.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी २०२१ मध्ये त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यावेळी केएल राहुलने अहान शेट्टीच्या ‘तडप’ चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. राहुल आणि अथियाने या प्रीमियरला एकत्र पोज दिली होती. त्यानंतर दोघंही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात. अलिकडेच सुनील शेट्टीही केएल राहुलचा सामना पाहण्यासाठी गेला होता. तर आथियाही अनेक वेळा सामना पाहताना दिसली आहे.