Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाची नाराजी संपेना?

शंभूराज देसाई स्पष्टच बोलले

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. पण खातेवाटपानंतर शिंदे गटातील अब्दूल सत्तार वगळता सर्वच मंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली होती. भाजपाने सर्व महत्वाची खाती स्वतःकडे ठेवत दुय्यम खाती शिंदेगटाला दिली आहेत त्यामुळे शिंदे गटात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.या नाराजीनाट्यावर शंभुराजे देसाई यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

शंभूराजे देसाई म्हणाले की, खाते वाटपावर आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. नाराज असल्याचा वावड्या जाणीवपूर्व उठवल्या जात आहेत, असे ते म्हणाले. तसंच चांगल्या वातावरणात अधिवेशन पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खातेवाटपानंतर शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे यांच्यासह काही मंत्री नाराज असल्याच्या जोरादर चर्चा आहेत. यावरुन विरोधकांनी देखील टीका केली होती. यावर ते म्हणाले की,आम्ही पहिल्या टप्प्यात शपथ घेतलेले शिवसेनेचे नऊ मंत्री आहोत. या मंत्र्यांकडे कोणते विभाग द्यायचे हा पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकार दिला होता असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

आम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचं का नाही, घेतल्यावर कोणतं खातं द्यायचं याचा निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.पण कुणीतरी अशा वावड्या उठवत आहे. पण आम्ही उत्तम काम करण्यावर आमचा भर आहे. आम्ही कुणीही नाराज नाही, असंही देसाई म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!