
जुन ते सोन! बैलगाडीतूनच काढली नवरा नवरीची वरात…
बार्शी तालुक्यातील बाभुळगावातील वरातीची चर्चा, व्हिडिओ व्हायरल
बार्शी दि ६(प्रतिनिधी)- सध्याच्या काळातील नवरदेव नवरीला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे म्हणत आलिशान गाडयातून आपल्या घरी घेऊन जाताना दिसतात पण बार्शी तालुक्यातील बाभुळगाव मधील यादव कुटूंबियांतील लग्न सोहळ्यातील नवरा नवरीची वरात चक्क बैलगाडीतून वाजत गाजत काढण्यात आली. ही वरात जुन्या आठवणीला उजाळा देणारी ठरल्याने गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. ह्या वरतीचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनलाय.
लग्न म्हणजे दोन जीवाचे व कुटूंबाचे मिलन असल्याने या सोहळ्याला विशेष महत्व असते, सध्या काळातील लग्नसराई खर्चीक होत असताना केवळ हौस म्हणून खर्चाचा विचार न करता लग्न मात्र चांगले झाले पाहिजे यावर दोन्ही कुटूंबे विचार करत असतात. लग्नातील वरात डिजे बॅजो बँडसह फटाक्याची आतषबाजी करण्यावर भर असतो. सगळी हौस पूर्ण व्हावी अस वाटत असते, तीच हौस पूर्ण झाली अस म्हणायला काय हरकत नाही, चिरंजीव धनंजय आणि मनीषा यांचा विवाह 4 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाला… जुन्या चालीरिती परंपरा लोप पावत चालली असली तरी बाभुळगाव येथील लक्ष्मण शिंदे यांच्या भाच्याचा विवाह धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील लाखनगाव येथील ग्रामीण विद्यालय येथे पार पडला, लग्नानंतरची वरातही चक्क बैलगाडीतून डी जे बँड वाजवत वाजंत्रीच्या ताफ्यातून चक्क 3 तास ही वरात वाजत गाजत गावाच्या वेशीवरून घरापर्यंत काढत जुन्या आठवणीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी गावातील जेष्ठ मंडळी,गावकरी तसेच धनंजय यादव यांचा मित्र परिवार तसेच नातेवाईक मोठ्या उत्साहात या वरातीत सहभागी झाली होती