Latest Marathi News
Ganesh J GIF

‘या’ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर, या तारखेला लागणार निकाल

दिल्ली दि १८(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २०२३ सालात होणारी ही पहिल्याच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याचबरोबर पुणे आणि चिंचवडमध्येही पोट निवडणूक होणार आहे.

देशातील तब्बल नऊ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यापैकी आता नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. नागालँड विधानसभेचा कार्यकाळ १२ मार्च, मेघालय विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च आणि त्रिपूरा विधानसभेचा कार्यकाळ २२ मार्च रोजी संपणार आहे.या वर्षी त्रिपुरामध्ये १६ मार्च रोजी, तर मेघालय आणि नागालँड मध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार. या तिनही राज्यातील मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्रिपुरामध्ये गेल्या वर्षी भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवला होता. राज्यातील २५ वर्षातील डाव्या आघाडीची सत्ता त्यांनी काढून घेतली होती. भाजपने २०१८ साली ३५ जागा जिंकल्या होत्या. तर मेघालयमध्ये नॅशनल पिपल्स पार्टी आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २१ जागा जिंकल्या होत्या. पण भाजपने अन्य पक्षांना एकत्र करून सत्ता स्थापन केली होती. तर नागालँडमध्ये NDPP आणि भाजपा युतीचे सरकार सत्तेत होते. आता पुन्हा एकदा त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तिनही राज्यसत ६० जागांवर निवडणुका होणार असुन विजयासाठी ३१ चे संख्याबळ गरजेचे असणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कसबापेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा निवडणुकांच्या जागासाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारांना १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असून २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!