Just another WordPress site

नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या गाडीला लागली आग…

गाडीला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल, बघा नेमक काय झाल...

जळगाव दि १५(प्रतिनिधी)- लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पण एका नवरदेवाला लग्नाचा दिवस संकटाचा ठरला आहे. कारण जळगावात नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातील कजगाव येथे हा प्रकार घडला आहे. सुदैवाने गाडीतून प्रवास करणारे नवरदेवासह पाचही जण बचावले आहेत.

अमरावती येथील रोहन हरी डेंडूळे यांचे मंगळवारी मालेगाव येथे लग्न होते. या विवाह सोहळ्यासाठी स्वतः नवरदेव रोहन डेंडूळे यांच्यासह आकाश शिवदास डेंडूळे, वैशाली अमर बागरे व चालक राहुल वैराळे असे पाच जण कारमधून जात होते. पण कार भडगाव तालुक्यातील कजगाव गावाजवळ आल्यावर झारची वायर जळाल्याचे लक्षात आले.प्रसंगावधान राखत तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली. कारमधील नवरदेव तसेच इतर चार जण बाहेर आले आणि लगेचच कारने पेट घेतला. सुदैवाने रस्त्यावर वाहतूक जास्त नसल्याने मोठे नुकसान टळले आहे. आगीच्या घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

GIF Advt

विशेष म्हणजे वऱ्हाडींच्या वाहनाने नवरदेव तसेच इतर लोक विवाह सोहळ्यासाठी रवाना झाले. त्यामुळे लग्न व्यवस्थित पार पडले आहे.  ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ अशी चर्चा यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये रंगली होती.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!