Latest Marathi News
Ganesh J GIF

धोका वाढला! देशभरात पुन्हा एकदा लाॅकडाऊन

रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, सरकारकडून खबरदारीचे आवाहन, धक्कादायक आकडेवारी समोर

मुंबई – देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. देशात सक्रिय रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. हा आकडा आता हजाराच्या घरात पोहोचल्यामुळे देशात पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीसह देशातील इतर अनेक राज्यांमध्येही कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांत जास्त प्रकरणं समोर आली आहेत. जरी बहुतेक प्रकरणं सौम्य लक्षणांची असली, तरी प्रशासन सतर्क आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, सध्या देशात कोविडचे ३७५८ अ‍ॅक्टिव्ह प्रकरणं आहेत. मागील १० दिवसांत १२०० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे, जी अत्यंत चिंताजनक आहे. २२ मे २०२५ रोजी देशात फक्त २५७ सक्रिय प्रकरणं होती, जी २६ मेपर्यंत १०१० झाली. गेल्या २४ तासांत ३६३ नवीन प्रकरणं समोर आली असून, दोन रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. रविवारीपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये १४००, महाराष्ट्रात ४८५ आणि दिल्लीमध्ये ४३६ सक्रिय प्रकरणे आहेत. जगभरात वाढणाऱ्या कोविड संक्रमणामागे ओमिक्रॉन वेरिएंटचे नवीन प्रकार कारणीभूत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लवकरच अधिक कडक उपाययोजना केल्या जाऊ शकतात. सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयांमध्ये आणि संवेदनशील भागांमध्ये पुन्हा एकदा कोविड प्रोटोकॉल लागू करण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या NB.1.8.1 नावाच्या नव्या प्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. हा प्रकार ओमिक्रॉनशी संबंधित असून, झपाट्याने पसरतो. याचे लक्षण ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी, नाक वाहणे आणि भूक कमी होणे असते. सामान्य सर्दीप्रमाणे लक्षणे असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आरोग्य मंत्रालय आवाहन केले आहे.

गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे ६५ सक्रिय रुग्ण आढळले. तर ५१२ रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. परंतु या कालावधीत आणखी पाच रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. मृत्यू झालेल्या पाच रुग्णांमध्ये केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक आणि महाराष्ट्रातील दोघे आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!