दुरावा संपणार! उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप, पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली, ऑपरेशन समेट?
मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? याची बऱ्याच चर्चा होती. त्यातून विधानसभा निवडणुकांनंतरही याची चर्चा रंगली होती. परंतु आता याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर ती खूप आनंदाची गोष्ट असेल. यासोबतच त्यांनी असेही म्हटले की मी काल जे बोललो ते सत्य आहे म्हणून मी मागे हटणार नाही. शिवसेनेचे दोन तुकडे होणे मान्य नाही. फाळणी का झाली हे सर्वांना माहिती आहे.” जर ते एकत्र आले तर ती आनंदाची गोष्ट आहे. पण यासाठी मी वेगळे प्रयत्न करेन असे नाही. त्यांना एकत्र यावे लागेल की नाही, याचा निर्णय शिंदे साहेब आणि उद्धव साहेब काय घेतील हे सांगायला मी काही विद्वान नाही, असेही ते म्हणाले आहेत. दोन शिवसेना होणं शिवसैनिकांना आवडलं नाही. माझ्याही मनाला यातना होतात. उबाठाचे नेते, पदाधिकारी भेटले की, त्यांच्या आणि आमच्या मनाची अवस्था अशीच असते. तू त्या पक्षात, मी ह्या पक्षात हे दोघांनाही पटत नाही. पण करावं काय? सत्तेमध्ये जाण्याचा धडपडीचा हा परिणाम झाल्याचे मंत्री शिरसाट म्हणाले आहेत. तसेच यासाठी वरिष्ठ फळीतल्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊ शकते, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
एकीकडे ठाकरें आणि शिदेंना आता जोडण्याची वेळ आली आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात बरेच राजकीय नाट्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.