
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले तिस-यांदा लग्न
पतीही आहे प्रसिद्ध अभिनेता, लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- गेम ऑफ थ्रोन्स’ चित्रपटातील लोकप्रि ‘सर्सी लॅनिस्टर’ची भुमिका करत लोकप्रिय झालेली अभिनेत्री लिना हेडी सध्या चर्चेत आली आहे कारण ती तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. तिने नुकतेच अभिनेता मार्क मेनचाका याच्याशी लग्न केले. त्यांच्या विवाहसोहळ्यात गेम ऑफ थ्रोन्समधील विविध कलाकार सहभागी झाले होते. या सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत.
लिनाचे लग्नात अतिशय गुप्तता पाळण्यात आली अत्यंत खाजगी असा सोहळा केवळ जवळचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला.लीनाने लग्नात सुंदर असा पांढरा ड्रेस घातला होता. तर मेनचाकाने थ्री-पीस सूट आणि बेज कॅपसह गुलाबी टाय घातली होती. अर्थात हे फोटो दोघांच्या अधिकृत हँडेलवरुन शेअर करण्यात आलेली नाहीत तर गेम्स ऑफ थ्रोन्स या इन्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेले आहेत.मेनचाका हाही प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटात भुमिका केली आहे.विशेष म्हणजे २०१६ च्या ब्रेकनरिज फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याच्या भूमिकेसाठी मेनचाकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे.
लीना हेडीने २००७ मध्ये संगीतकार पीटर पॉल लॉफरनसोबत लग्न केले होते. पण२०१३ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर तिने २०१८ मध्ये दिग्दर्शक डॅन कॅडनशी लग्न केले पण वर्षभरातच त्यांचा संसार मोडला. त्यानंतर तिने आता मेनचाका बरोबर लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे ही जोडी २०२० पासून एकमेकांना डेट करत होती.