भर कार्यक्रमात या प्रसिद्ध अभिनेत्रीला आपल बोलणे थांबवावे लागले
बोलायला उभी राहताच लोकांनी केले असे काही की...पाहा व्हिडीओ
मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंतमुळे अभिनेत्री उर्वशी रोतेला जास्तच लाईमलाईटमध्ये आली आहे. तसेही ती तिच्या हटके स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असते.तिच्या आगामी ‘वॉल्टेयर वीरैया’ चित्रपटात उर्वशी दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवींसह आयटम सॉंग करताना दिसणार आहे. उर्वशी सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.यावेळी एका प्रकार समोर आला आहे.
वॉल्टेयर वीरैया’ चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये जे काही झाले त्याची चर्चा सुरु झाली आहे. ती बोलायला लागली आणि तेवढ्यात प्रेक्षकांमधून आवाज आला… ऋषभ, ऋषभ. हे सगळं उर्वशीसाठी धक्कादायक होते. व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. रिषभ पंतचं नाव घेतल्यानंतर उर्वशीने लगेचच बोलणं थांबवल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. उर्वशीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “प्रेक्षक रिषभ पंत असं म्हणत आहेत”, अशा प्रकारच्या कमेंट नेटकरी करत आहे. आणखी एक जण म्हणतो की, उर्वशी तू तर बॉलीवूडची राणी आहेस. ऋषभचा अपघात झाल्यानंतर उर्वशी ही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती.
उर्वशीने देखील आश्चर्य व्यक्त केले आहे ती म्हणाली “चिरंजीवी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते आहे याचा आनंद आहे. चिरंजीवी याचा अर्थ आहे अमर…ते त्यांच्या चाहत्यांसाठी अमर आहेत. त्यांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळते. असं प्रेम की ज्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते”. असं ती म्हणाली आहे.