Latest Marathi News
Ganesh J GIF

सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात

बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू ३४ जखमी, दोन्ही वाहनांचा चक्काचूर

नाशिक दि १३(प्रतिनिधी)- सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास साई दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. खासगी बसमध्ये एकूण ५० प्रवाशी होते. तर, बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर येथून साई भक्त शिर्डी येथे दर्शनाला जात असतानाच हा अपघात घडला आहे. उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला. पाथेर गावच्या जवळ खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला, तर जण जखमी झाले. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ७ ते ८ रुग्णवाहिका रुग्णांना रुग्णाला देण्यासाठी दाखल झाल्या होत्या. जखमी झालेल्या प्रवाशांना सिन्नर आणि नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये सहा महिला दोन पुरुष व दोन लहान बालकांचा समावेश आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता व काचेचा खच साचला होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह वावी पोलिसांचे पथकही घटनास्थळी हजर झाले होते. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.जखमींना विविध ठिकाणी नेल्याने मृतांची व जखमींची नावे कळण्यास उशीर होईल. असे सांगण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!