Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने न्यायालयासमोर केले सरेंडर

या प्रकरणी अटकेची टांगती तलवार कायम, सरेंडर होण्याचे कारण असणारे हे आहे प्रकरण?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि गदर २ मुळे चर्चेत असलेली अभिनेत्री अमिषा पटेल सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेत्री अमिषा पटेलने सिव्हिल न्यायालयासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर न्यायालयाने तिला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

अमिषाने २०१७ सालच्या एक केस प्रकरणी रांची कोर्टात आत्मसमर्पण केली आहे. अजय कुमार सिंग हरमू हाऊसिंग कॉलनीतील एका कार्यक्रमादरम्यान अमिषा पटेलला भेटला आणि चित्रपटात पैसे गुंतवण्याची ऑफर मिळाली होती. यावेळी अमिषा पटेलने सिंग यांना एका चित्रपटासाठी वित्तपुरवठा करण्याची चर्चा केली होती. सिंग यांनी चित्रपट निर्मिती प्रकल्पात गुंतवणूक केली. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे सिंग यांनी अमिषाकडे पैसे परत करण्याची मागणी केली.अशा परिस्थितीत अजयने अमिषाकडे पैशांची मागणी केली होती. पण तिने त्याला पैसे काही परत दिले नाही. त्यानंतर अमिषाने अजयला दोन चेक दिले होते. त्याचे ते दोन्ही चेक बाऊन्स झाले होते. हे बाऊन्स झालेला एक अडीच कोटींचा तर दुसरा पन्नास लाखांचा होता. फसवणूक झाली हे कळताच, अजयने न्यायालयात धाव घेत अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे कोर्टाकडून अमिषाला अनेकदा समन्स बजावण्यात आले होते. पण तिने कधीच कोर्टात हजेरी लावली नव्हती. अखेर आता वॉरंट जारी झाला असून ती सरेंडर झाली. अमिषा पटेलचा सध्या गदर २ प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना, हे प्रकरण समोर आल्याने जास्त चर्चा होत आहे.

अभिनेत्री विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केला होता. १७ जूनला अमिषाने सरेंडर केले होते. पण आता तिला १० हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. पण अमिषा २१ जूनला न्यायालयात हजर झाली नाही तर, तिचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!