Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्न घटिका जवळ आली असताना तरूणीने उचलले धक्कादायक पाऊल

जळगाव जिल्ह्यातील घटनेने परिसरात खळबळ, पहा नक्की काय झाल

जळगाव दि १६(प्रतिनिधी)- लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे. पण यावल तालुक्यातील अंजाळेत लग्न घटीका जवळ आलेल्या तरूणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. तरूणीने आत्महत्या केल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

मिळालेल्‍या माहितीनुसार मिनल निवृत्ती भागवत या तरुणीने राहत्या घरात छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.याबाबत मीनलचे वडील निवृत्ती किसन भागवत यांनी पोलिसांना खबर दिली. पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पण आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न जुळले असून तिचा साखरपुडाही झाला होता. दिवाळीनंतर विवाह होणार होता. पण त्याआधीच तरुणीने आत्मह्त्वा का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी हे करीत आहे. पण या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!