Just another WordPress site

शिंदेची लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी

भाजपाच्या गोटात खळबळ, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे विभाजन होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबाची शिवसेना अशा दोन शिवसेना निर्माण झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे पक्ष बांधणीसाठी कामाला लागले आहेत. पण बंडखोर आमदारांविरोधात तुल्यबळ उमेदवार शोधत असताना शिंदे परत एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.

पण हे शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे नसून माजी आमदार विजयराज शिंदे आहेत. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांना शिवबंधन बांधल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर दबंग आमदार संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी माजी आमदार विजयराज शिंदे हे पुन्हा शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे. शिंदे हे शिवसेनेचे ३ वेळेस आमदार राहिले आहेत. ते सध्या भाजपात आहेत. त्यांना पक्षात घेऊन गायकवाड यांना आव्हान देण्याची तयारी ठाकरे गटाकडून केली जात आहे. त्यामुळेच बुलढाण्यात संजय गायकवाड यांना विजयराज शिंदे यांच्याकडून आव्हान देण्याची रणनिती उद्धव गटाकडून आखली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाबरोबरच भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत.

GIF Advt

ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चेवर बोलताना शिंदे यांनी सुचक विधान केले आहे.”ही लोकशाही आहे. मी १५ वर्षात शिवसेनेचा आमदार म्हणून केलेल्या कामाची कुणी दखल घेत असेल तर वावगं काय? मात्र  उद्धव गटाच्या कुठल्याच मोठ्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही” असे सांगत सस्पेंन्स वाढवला आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक राजकीय उलथापालथी होणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!