Latest Marathi News

पुण्यात फडकला राज्यातील सर्वात मोठा तिरंगा

चार दिवस पाहता येणार हा भव्य तिरंगा

पुणे दि १३ (प्रतिनिधी)-  ‘आझादी का अमृतमहोत्सव’च्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभरात राबवला जात आहे. त्या अनुशंगाने पुण्यातील बाणेर येथे ‘नेटसर्फ नेटवर्क’यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. १२० फूट बाय ४० फूट इतक्या भव्य आकाराचा तिरंगा ध्वज लावत ‘नेटसर्फ’ने अनोखी सलामी दिली आहे. या ध्वजाला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

‘नेटसर्फ’ कंपनीने त्यांच्या बाणेर येथील मुख्यालयात एकत्र येत त्यांच्या संपूर्ण इमारतीला बाहेरून तिरंगा ध्वज लावला आहे. या भव्य तिरंगा ध्वजाचे अनावरण राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, “अनोख्या पद्धतीने राष्ट्राला वंदन करण्याचा नेटसर्फ नेटवर्कचा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत असून, भारतीयांच्या कल्पकतेने ‘हर घर तिरंगा’ या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, याचा आनंद वाटतो. इमारतीच्या भोवती सर्वात मोठा ध्वज लावल्याचा मला आनंद झाला.”असे पाटील म्हणाले आहेत. पुढील चार दिवस हा तिरंगा पुणेकरांना पाहता येणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ध्वजाच्या उद्घाटना प्रसंगी नेटसर्फ नेटवर्कचेचेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सुजित जैन, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. एस के जैन, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, पुनीत जोशी, संदीप खर्डेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!