Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात आजोबानेच ९ वर्षांच्या नातीसोबत केले घृणास्पद कृत्य

पुण्यातील नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच, पुण्यातून पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पर्वती परिसरात एका ७० वर्षीय व्यक्तीने आपल्या ९ वर्षांच्या सख्ख्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा पुन्हा एकदा हादरला असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई मजुरीचे काम करते. कामावर जाताना तिने विश्वासाने आपल्या ९ वर्षांच्या मुलीला ७० वर्षीय आजोबांकडे सांभाळण्यासाठी सोडले होते. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या या नराधम आजोबाने नात्याची सर्व मर्यादा ओलांडत पोटच्या मुलीच्याच मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या नराधमाने चिमुरडीचे कपडे काढून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
हा घृणास्पद प्रकार काही स्थानिक नागरिकांनी पाहिला आणि तातडीने धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी नराधमाच्या तावडीतून चिमुरडीची सुटका केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. संतापलेल्या नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर जमावाला शांत केले.

पोलीस कारवाई आणि पुढील तपास
पर्वती पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ७० वर्षीय नराधम आजोबाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीवर पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा ही कारवाई पूर्ण करण्यात आली. दरम्यान, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!