Latest Marathi News

दोन वर्षापूर्वी सुरु झालेल्या संसाराचा आत्महत्येने शेवट

नाशिकमध्ये नवदांपत्याची आत्महत्या, सुसाईड नोटमुळे गुढ वाढले

नाशिक दि २०(प्रतिनिधी)- नाशिकच्या पाथडी शिवारात रविवारी एका नवविवाहित दांपत्याने आत्महत्या केली आहे. नयनतारा गोल्ड या सोसायटीत गौरव जगताप आणि नेहा जगताप हे जोडपं राहत होतं. राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.त्यांच्या जवळ एक चिठ्ठी सापडल्याने या आत्महत्येचे गुढ वाढले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या अनमोल नयनतारा गोल्ड या सोसायटीत राहणाऱ्या गौरव जगताप आणि नेहा जगताप राहत होते.त्यांच्या मावशीने घरी फोन केला तेव्हा कोणीही फोन उचलला नाही. त्यामुळे मावशीने आपल्या मुलाला त्यांच्या घरी पाठवले. बराच वेळ दरवाजा उघत नसल्याने तो तोडल्यावर दोघे पती पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर पोलीसांनी घराची पाहणी केली असता घरातल्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या एका डायरीत गौरव आणि नेहा यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली. नोटमध्ये एका इसमाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच म्हटले आहे. गौरव आणि नेहा या दोघांनाही काहींनी लाखो रुपयांचा गंडा घातला होता. तसेच काही व्यक्तींकडून त्यांनी उसने पैसे घेतले होते. उसने पैसे घेतल्यावर घर खर्च आणि घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यात त्यांना मोठ्या अडचनींचा सामना करावा लागत होता.तसेच उसने घेतलेल्या व्यक्तींकडून त्यांना धमक्यांचे फोन देखील येत होते. याच जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे. चिठ्ठीत त्यांनी तिघांचे नाव लिहिले आहे. पोलीसांनी आता त्या दिशेने तपास सुरु केला आहे.

दोन वर्षांपूर्वी गौरवचा विवाह नेहा यांच्याशी थाटामाटात झाला होता. गौरव हे सातपूर येथील पेडीलाईट कंपनीत नोकरीला होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच गौरवची नोकरी गेली होती. त्यामुळे तो तणावात होता. नोकरी नसल्याने आर्थिक विवंचना निर्माण होऊन कर्ज वाढल्याचे समजते. त्यामुळेच दोघांनी संगनमत करुन टोकाचा निर्णय घेतला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!