बार्शीत २५ डिसेंबरला होणार हिंदु राष्ट्र-जागृती सभा
भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे आवश्यक, सभेत होणार मार्गदर्शन
बार्शी दि २०(प्रतिनिधी)- जगात १५७ ख्रिस्ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध आणि १ ज्यू राष्ट्र आहे; मात्र हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. ‘सेक्युलर’ भारतातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. सेक्युलर सरकार देवळे ताब्यात घेते अन् हिंदूंच्या यात्रांवर कर लादते. ‘लव्ह जिहाद’, ‘थूक जिहाद’ अशी षड्यंत्रे उघड होत आहेत. कर्नाटकात हिजाबविरुद्ध आंदोलन करणारे हर्ष, उत्तरप्रदेशात कमलेश तिवारी, गुजरातमध्ये किशन भरवाड या हिंदू नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या. या समस्यांवर उपाय म्हणून भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राची संवैधानिक मार्गाने भूमिका समजून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बार्शी येथे २५ डिसेंबर या दिवशी व्ही.के.मार्ट शेजारील समृद्धी लॉन्स या ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेचे निमंत्रण हस्तपत्रके, व्यापारी-प्रतिष्ठित यांच्या बैठका, फलक, विविध भागांत पुरुष आणि महिला यांच्या बैठका घेणे, उद्घोषणा, सामाजिक प्रसार माध्यम अशा विविध माध्यमांतून संपूर्ण बार्शीतील नागरिकांपर्यंत पोचवण्यात आले आहे. सभेच्या प्रसाराला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.