अजित पवार गटाच्या खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली
महत्वाची खाती मिळवण्यात अजित पवारांची बाजी, अर्थ खाते अजित पवारांकडेच, पहा संपुर्ण यादी
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागत नसताना, सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाचा शपथविधी होऊनही खाते वाटप होत नव्हते. अखेर तीनही नेत्यांनी दिल्लीवारी करत अमित शहांबरोबर बैठक घेत खातेवाटपावर अंतिम तोडगा काढला आहे. यात अजित पवार गटाने बाजी मारली असुन महत्वाची खाती मिळवण्यात त्यांना यश आले आहे.
खातेवाटपाची अंतिम यादी राजभवनावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कळीचा मुद्दा ठरलेले अर्थ खाते अजित पवारांकडेच असणार आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आज अर्थ खात्याच्या सचिवांबरोबर बैठक देखील घेतली होती. शिंदे गटाचा अर्थ खाते अजित पवारांना देण्यास विरोध होता. पण अर्थ खाते अजित पवारांकडेच असणार आहे. महत्वाचे म्हणजे शिंदे गटाकडे असणारे कृषी खाते देखील अजित पवार गटाला मिळाले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना दुसरे खाते मिळणार की डच्चू दिला जाणार हे आगामी काळात सदष्ट होणार आहे. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांकडे देण्यात येणाऱ्या संभाव्य खाते वाटपाची याची सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे अजित पवार माहिती देताना म्हणाले की, माझ्या माहितीनुसार खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहचली आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी दिल्यानंतर मंत्री लवकरच जबाबदारी घेतील. त्यानंतर ते कामाला सुरवात करतील, असे सांगितले. तसेच तीनही पक्षांमध्ये समन्वय असुन कोणीही नाराज नसल्याचे पवार म्हणाले आहेत.
अजित पवार गटाचे खाते वाटप?
अजित पवार- अर्थ
छगन भुजबळ- अन्न नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील- सहकार
हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण
धनंजय मुंडे- कृषी
अदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण
अनिल पाटील- मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
धर्मराव अत्राम- अन्न आणि औषध प्रशासन
संजय बनसोडे- क्रीडा व युवक कल्याण, बंदरे