Latest Marathi News
Ganesh J GIF

पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पती आणि सासूची हत्या

दुहेरी हत्याकांप्रकरणी महिलेला मित्रासह अटक, हत्येचा अनेक महिन्यानंतर खुलासा, कारणही समोर

गुवाहाटी दि १४(प्रतिनिधी)- आसाममधील गुवाहाटीत एका महिलेने पती आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. महिलेने सात महिन्यापुर्वी तिचा प्रियकर आणि मित्रासोबत पती आणि सासूची हत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्याने छिन्नविछिन्न मृतदेह पॉलिथिनमध्ये टाकले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मेघालयच्या डोंगरावर फेकून दिले होते. पण त्याचा अखेर खुलासा झाला आहे.

अमरज्योति डे, आणि शंकरी डे असे हत्या करण्यात आलेल्या मायलेकरांची नावे आहेत. तर वंदना कलिता असे हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे हे हत्याकांड २०२२ मध्ये करण्यात आले होते. महिलेने पती आणि सासूची हत्या करून ते हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार अमरज्योती डे आणि बंदना कलिता गुवाहाटी शहराच्या पूर्वेकडील नारेंगी येथे राहत होते. त्यांचे वैवाहिक जीवन काही वर्षे चांगले चालले. मात्र अमरज्योती यांचे धनजीत डेका नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर पती-पत्नीमध्ये या गोष्टीवरून वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे बदिताने आपला प्रियकर आणि साथीदारांसह त्यांच्या मृतदेहाचे तुकडे मेघालयच्या डोंगराळ भागात फेकून दिले. पण काही महिन्यानंतर बंदिताने सासूच्या बँक खात्याचे एटीएम वापरल्यानंतर याचा खुलासा झाला. बंदिता आणि तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दुहेरी हत्याकांडप्रकरणी १६०० पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. आरोपपत्रात मुख्य आरोपी बंदना कलिता आणि अन्य दोन आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे बंदिता आणि तिच्या पतीचे लव्हमॅरेज होते. पण नंतर मात्र त्यांच्यात वाद होत गेल्याने नात्यात अंतर पडले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!