
प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर
नाशिक, रायगड, बीडमध्ये कोण करणार ध्वजारोहण?, पहा तुमच्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?
मुंबई – भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्ह्यास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. पण काही ठिकाणी दोन आणि काही ठिकाणी पालकमंत्री नसल्यामुळे ध्वजारोहण कोण करणार? यांची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण होणार आहे. त्याचबरोबर नियोजित ठिकाणी राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करावे, असा आदेश देण्यात आला आहे.
ध्वजारोहण करणारे मंत्री
ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार
नागपूर – चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील
वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन
पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड,
मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा
मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार
रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत
धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे
चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके
सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई
बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे
लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे
हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे
छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे
अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर
गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर
परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक