Latest Marathi News
Ganesh J GIF

देशभरातील सर्वात श्रीमंत आमदारांची यादी जाहीर

महाराष्ट्रातील या आमदारांचा टाॅप टेन यादीत समावेश, हे ठरले सर्वात श्रीमंत आमदार, पहा यादी

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- देशभरातील आमदार आणि त्यांच्याकडे असलेली संपत्ती कायमच चर्चेचा विषय असतो. अनेकदा त्यावरून वाद देखील होत असतात. पण आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने देशात सर्वांत श्रीमंत आणि गरीब आमदारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये देशात काही ना काही कारणाने चर्चेत असलेल्या नेत्यांचा समावेश झालेला आहे.

सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा पहिला क्रमांक असून त्यांची एकूण संपत्ती ही १,४१३ कोटी रुपये आहेत. त्यानंतर कर्नाटकातील अपक्ष आमदार आणि उद्योगपती केएच पुट्टास्वामी गौडा यांचा क्रमांक लागतो. गौडा यांच्याकडे १२६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यानंतर कर्नाटकातील आमदार प्रियकृष्ण यांचा श्रीमंत आमदारांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे एकूण ११५६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तीन सर्वांत श्रीमंत आमदार कर्नाटकातील आहेत. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक श्रीमंत १२ आमदार हे फक्त कर्नाटकातील आहेत. त्यातही कर्नाटकातील १४ टक्के आमदार अब्जाधीश आहेत, त्यांची संपत्ती प्रत्येकी १०० कोटी किंवा त्याहून अधिक आहे. कर्नाटकातील आमदारांची सरासरी मालमत्ता ६४.३ कोटी रुपये आहे. देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीतील टॉप दहा आमदारांपैकी चार काँग्रेसचे आणि तीन भारतीय जनता पक्षाचे आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन आमदारांचा या यादीत समावेश आहे. ते दोनही आमदार भाजपाचे आहेत. तर गरीब आमदारांचा विचार केला तर बंगालमधील भाजपाचे आमदार निर्मल कुमार धारा हे देशातील सर्वात गरीब आमदार ठरले आहे. त्यांच्याकडे केवळ १७०० रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय, ओडिशातील अपक्ष आमदार मकरंद मुदुली यांच्याकडे केवळ १५,००० रुपयांची संपत्ती आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे आमदार नरिंदर पाल सिंग यांच्याकडे केवळ १८,३७० रुपयांची संपत्ती आहे.
देशातील श्रीमंत आमदार

डीके शिवकुमार कर्नाटक- १,४१३ कोटी
केएच पुट्टास्वामी गौडा कर्नाटक- १,२६७कोटी
प्रियकृष्ण कर्नाटक – १,१५६ कोटी
एन चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश- ६६८ कोटी
जयंतीभाई सोमाभाई पटेल गुजरात- ६६१ कोटी रुपये
सुरेशा बीएस कर्नाटक – ६४८ कोटी
वायएस जगन मोहन रेड्डी आंध्र प्रदेश- ५१० कोटी
पराग शहा महाराष्ट्र- रु ५०० कोटी
टी.एस. बाबा अंबिकापूर छत्तीसगड- ५००कोटी
मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र- ४४१ कोटी

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!