मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर चाहत्यांना दिली गुड न्यूज
पोस्ट पाहून चाहत्यांच्या भन्नाट कमेंट, पारंपारिक लुकला फाटा दिलेली ती पोस्टही व्हायरल, पोस्ट पहाच
पुणे दि २१(प्रतिनिधी)- मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाड ओळखली जाते. अमोल कोल्हेंच्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. सध्या ती ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये काम करत आहे. तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे चाहते देखील खुश झाले आहेत.
प्राजक्ताने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत प्राजक्ताने गळ्यात आयडी, ब्लेझर परिधान केला आहे. प्राजक्ताने नुकतंच अभियांत्रिकी पदवी संपादन केली आहे. याबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता छान मार्कांनी पास होत इंजिनिअर झाली आहे. तिने फोटो शेअर करताना ‘कॉम्प्युटर इंजिनिअरींग शिक्षण (Computer Engineering) पूर्ण केले. डिस्टिंक्शनसह प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केली. ( CGPA : 8.77 ), इंजिनिअर अभिनेत्री’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तिने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.यातील बहुतेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. पण काहींनी मात्र नोकरीसाठी अर्ज कर असा सल्ला दिला आहे. एकाने तर कमाल करत “TCS मध्ये vacancy आहेत पटकन apply कर….होऊन जाईल.” अशी मजेशीर कमेंट केली आहे. दरम्यान प्राजक्ता
लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. काही आठवड्यांपूर्वी ती हैदराबादला शूटिंगला गेली होती. तिथला चित्रीकरणावेळी नारळ फोडतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला होता.
प्राजक्ता गायकवाड काही दिवसापुर्वीच नवीन घर खरेदी केले होते. तसेच नेहमी पारंपारिक वेशभुषेत दिसणाऱ्या प्राजक्ताने ग्लॅमरस फोटोशूट केले होते. फॅशन यशस्वी झाली की सौंदर्यही खुलून दिसतं, असे कॅप्शन तिने तिच्या फोटोंना दिले होते.