मराठी अभिनेत्रीचा सोन्यात मढलेल्या म्हाळसा लूकने चाहते घायाळ
चाहत्यांकडून फोटोवर कौतुकांचा वर्षाव, व्हिडिओवर नेटक-यांकडून लाईक्सचा पाऊस
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. प्राजक्तराजच्या माध्यमातून तिने व्यवसायात देखील पाऊल टाकले आहे. आता तिचा एक लुक चांगलाच व्हायरल झाला आहे.
प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर नवनवीन आणि हटके फोटो पोस्ट करत असते. नुकताच प्राजक्ताचा खास असा म्हाळसा लूक समोर आला आहे.यावेळी प्राजक्ताने आकाशी रंगाच्या सहावारी साडीवर ब्लॅक कलरचे स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे. पायात पैजण, गळ्यात दागिने, हातात बांगड्या, कमरेला कमरपट्टा, नाकात नथ, कानात सिल्व्ह रंगाची कर्णफुले, कपाळावर चंद्रकोर, केसांचा अंबाडा, बाजूबंद, मेकअप अणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. इतर अनेक लुक प्रमाणे चाहत्यांना प्राजक्ताचा म्हासळा लुक खुपच आवडला आहे. प्राजक्ताने घातलेले दागिने तिच्याच प्राजक्तराज मधील आहे. यावेळी प्राजक्ताने फोटो पोस्ट करत म्हाळसा, बरेच जण website वर सोनसळा बघून जातायेत. पुढे म्हाळसा आणि तुळजा पण आहे. Don’t miss it… Celebrating 1 month to the @prajaktarajsaaj असे कॅप्शन दिले आहे.
प्राजक्ताच्या या फोटो व्हिडिओ वर चाहते कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत. प्राजक्ताच्या मागील हिरवीगार झाडे देखील तिच्या या लुकला चार चांद लावल्याचे दिसत आहेत. चाहत्यांनी प्राजक्ताच्या या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी सेंड करत तिचे कौतुक केले आहे. तिच्या व्हिडिओलाही भरपूर व्हिव्ज मिळाले आहेत.