Latest Marathi News
Ganesh J GIF

मंत्र्यांनी ‘हनी हनी’ म्हणत मनसोक्त हनीमूनचा आनंद घेतला. पण…

माजी मंत्र्याच्या पत्नीचा गंभीर आरोप, हनी ट्रॅपचे पुरावे असल्याचा दावा, वेळ आल्यानंतर मी सगळं चॅनलवरती....

मुंबई – महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात हनीट्रॅप प्रकरणाने खळबळ उडवली आहे. तब्बल ७२ क्लास वन अधिकारी आणि काही माजी मंत्र्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंग केल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. आता याबाबत करूणा शर्मा यांनी मोठा दावा केला आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात हनीट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सादर करत सरकारच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणावर आता करुणा शर्मा यांनी तीव्र भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. करुणा शर्मा यांनी एका व्हिडीओद्वारे या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, प्रशासकीय अधिकारी, मोठमोठे नेते आणि मंत्र्यांनी ‘हनी हनी’ म्हणत मनसोक्त हनीमूनचा आनंद घेतला. पण, मन भरल्यानंतर तेच हनी त्यांना ट्रॅप वाटायला लागलं आहे. कुठे चाललाय आपला महाराष्ट्र? माझ्याकडे मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनीट्रॅपचे पुरावे आहेत, आणि योग्य वेळी मी हे सर्व चॅनेलवर उघड करेन, असा इशारा करुणा शर्मा यांनी दिला आहे. त्यामुळे हनीट्रॅपची व्याप्ती वाढली आहे. करूणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला आहे. पोटगी संदर्भात मी लढाई जिंकल्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. माझे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शेअर करू अशी धमकी दिली जात असून माझ्या मुलीचे किडनॅपिंग करण्याचे देखील षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यातच आता हनी ट्रॅप प्रकरणात आपल्याकडे पुरावा असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.

नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमधील घटनेमुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. एका राजकीय नेत्याने अनौपचारिक संभाषणात ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा खुलासा केला. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात एका महिलेने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!