Latest Marathi News
Ganesh J GIF

माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर जमावाची दगडफेक

दगडफेक केल्याचा व्हिडिओ व्हायरल, भाजपावर आरोप, नेमकं काय घडल?

दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जोर वाढताना दिसून येत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पक्षात आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पण यातच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर वीट आणि दगड फेकून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर आपकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. आम आदमी पक्षाने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’वरून हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला, “भाजप पराभवाला सामोरे जाण्यास घाबरत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला!” भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर विटा, दगडफेक केली. प्रचार करू नये म्हणून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला. भाजपवाल्यांनो, केजरीवालजी तुमच्या भ्याड हल्ल्याला घाबरणार नाहीत, दिल्लीचे लोक तुम्हाला योग्य उत्तर देतील. अशी टीका करण्यात आली आहे. त्यानंतर आम आदमी पार्टीने केलेले हे आरोप फेटाळत अरविंद केजरीवाल यांच्या कारने भाजपाच्या एका कार्यकर्त्याला चिरडल्याचा प्रत्यारोप भाजपाचे नेते प्रवेश वर्मा यांनी केला आहे. या कार्यकर्त्याचा पाय तुटला असून त्याला आम्ही रुग्णालयात घेऊन जात आहोत, अशी माहितीही प्रवेश वर्मा यांनी दिली आहे.

https://x.com/AamAadmiParty/status/1880572930943513046?t=lx7b9akRlP3tzPxk1F9iVw&s=09

दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. सर्व पक्ष जोरदार प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपही होत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!