बिदर दि ७ (प्रतिनिधी)-कर्नाटकातील बिदरमधील ऐतिहासिक महमूद गवान मदरसा आणि मशिदीमध्ये जमावाने घुसखोरी करत पूजा केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमावाने परिसरातील एका कोपऱ्यात पूजा घातली असा दावा आहे. तसंच जमावाने घोषणाबाजी करत तोडफोड केल्याचंही सांगितलं जात आहे. यामुळे तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार “या ठिकाणी निजामच्या काळापासून दसऱ्याला पूजा करण्याची परंपरा आहे. मशिदीच्या आवारात एक मिनार आहे. नेहमी दोन ते चार लोक आतमध्ये पूजा करण्यासाठी जातात. पण यावेळी मोठ्या संख्येने लोक आतमध्ये गेले होते. पण कोणीही बेकायदेशीरपणे गेट तोडून आतमध्ये घुसखोरी केलेली नाही. आम्ही गुन्हा दाखल केला आहे” असे सांगितले पण या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. मुस्लिम संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे.जमावाने गेट तोडत आतमध्ये प्रवेश केला यावेळी सुरक्षारक्षकाला धमकावले आणि मशिदीच्या भिंतींजवळ कचरा फेकला असा त्यांचा आरोप करत आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात आली नाही तर शुक्रवारी आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला होता. दस-याच्या दुस-या दिवशी म्हणजे ६ ऑक्टोबरला ही घटना घडली आहे.
Visuals from historic Mahmud Gawan masjid & madrasa, Bidar, #Karnataka (5th October). Extremists broke the gate lock & attempted to desecrate. @bidar_police @BSBommai how can you allow this to happen? BJP is promoting such activity only to demean Muslims pic.twitter.com/WDw1Gd1b93
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 6, 2022
या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही ट्विटरला या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पोलीस आणि भाजपाला लक्ष्य केलं असून, मुस्लिमांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे.