
‘आई-वडिलांना शिव्या द्या पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही’
भाजपाच्या 'या' कॅबिनेट मंत्र्यांचा विरोधकांना दम, निवडणुकीत पाडण्याचा इशारा
पुणे दि ७ (प्रतिनिधी)- कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक विधान केले आहे. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही असं एका नेत्याने आपल्याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते असणाऱ्या राजू शेट्टी यांना सांगितल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “पक्षाने काहीतरी विचार करुन आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यापूर्वी आपण सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये काम केले आहे. हातकणंगले मतदारसंघातील निवडणूक प्रचारामध्ये राजू शेट्टी हे अनेकदा पंतप्रधान मोदींना शिवागाळ करत होते मात्र आपण शेट्टींना सव्वा लाख मतांनी हरवलं. परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादांनी मला संपवलं. दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादावमोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही. असे म्हणत आपण मोदी शहांचा किती आदर करतो हे दाखवून दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात शिंदे गटाबरोबर युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर भाजपाच्या शंभर जागा निवडणूक आणा असे देखील सांगितले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या वाटणीला कमी जागा येतील असा अंदाज तत्पूर्वी युतीची शक्यता जाहीर करत त्यांनी आघाडी घेतली आहे.