राष्ट्रवादीने ‘असे’ फेडले राज्यपाल कोश्यारींचं धोतर
पुण्यात राज्यपाल कोशारींच्या 'त्या' वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध
पुणे दि २१ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करताना शिवाजी महाराज जुन्या पिढीचे आदर्श होते असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावेळी पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांचे धोतर फेडण्याचा इशारा दिला होता. त्यांनी आज आपला शब्द खरा करत राज्यपालांचे धोतर फेडले आहे.त्याचबरोबर त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाचा निषेधही केला आहे.
पुण्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वारगेट येथील सावरकर पुतळ्याजवळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचासारखा डमी आणत त्यांना उठाबश्या काढायला लावल्या. तसंच या डमीचे धोतर फेडत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीने डमी राज्यपालांचे धोतर फेडत आपली हाैस पूर्ण केली आहे. यावेळी प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्हाला सांगायचे आहे की, हा महाराष्ट्र कालही छत्रपतींचा होता आजही छत्रपतींचा आहे आणि उद्याही छत्रपतींचा राहील. मात्र भाजपची लाचारी पत्करलेल्या मुख्यमंत्र्यांना सावरकरांचा अपमान दिसतो पण छत्रपतींच्या अपमानावर ते सोयीस्कर मौन बाळगून आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात टिका केली आहे. राष्ट्रवादीच्या या आंदोलनाची जोरदार चर्चा होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं.त्यांच्या या वक्तव्याचा राज्यात सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. आता तर शिंदे गटानेही राज्यपालांवर टिका करताना भाजपाला देखील सुनावले आहे. त्यामुळे भाजपा एकाकी पडली आहे.