Just another WordPress site

बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी या दोन मंत्र्यांवर जबाबदारी

सीमा प्रश्नाबाबत मुख्यमंत्री शिंदेंचा महत्वाचा निर्णय, केंद्राकडे ही मागणी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- राज्य सरकारने कर्नाटकबरोबर असलेला सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य सरकारमधील दोन महत्वाच्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या यादीतही पक्षीय समतोल साधण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी मोठा निर्णय घेताना सीमा वासियांना विश्वास दिला आहे शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील बांधवांना प्रभावीपणे होण्यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करावे, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्याचा तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देखील सीमा भागातील बांधवांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिका-यांसोबत शिंदे यांनी चर्चा केली आहे.

GIF Advt

एकनाथ शिंदे यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सीमा प्रश्नी त्या भागातील बांधवांच्या नेहमी पाठीशी राहिले होते असे सांगितले. मुख्यमंत्री आक्रमकपणे सीमाप्रश्न मांडत असताना फडणवीस यांनी मात्र लोकशाही मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी भुमिका मांडली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!