
पुणे दि १९ (प्रतिनिधी)- लोळावळ्यातील एका दुकानात आलेल्या ग्राहकाच्या पिशवीला ब्लेड मारून त्यातील १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम दोन महिलांनी लंपास केली आहे. या अज्ञात महिलांचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
लोणावळ्यातील एका दुकानात ही घटना घडली आहे. एक वृद्ध ग्राहक महिलेच्या पिशवीला ब्लेड मारून या दोन महिलांनी महिलेच्या बॅगेतील दीड लाख रुपये लंपास केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन महिलांचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. दोन महिला दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. यावेळी शेजारील बाकावर बसलेल्या वृद्ध महिलेच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे लक्ष आहे. आणि नंतर संधी साधत त्यांनी त्यांच्या पिशवीला ब्लेड मारत मोठ्या रकमेवर डल्ला मारला आहे.लोणावळा पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांचा शोध घेत आहेत.
एकट्या आणि वृद्ध नागरिकांना कुटण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. लोणावळ्यातही वृद्धाचे ठग महिलांनी दीड लाखा रुपये लंपास केले आहेत.त्यामुळे त्यांना शोधण्याचे काम लोणावळा पोलीस करत आहेत.