पोलीसाने तक्रार करण्यासाठी आलेल्याच्या कानशिलात लगावली
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलाने घेतला 'हा' निर्णय
उत्तर प्रदेश दि १९(प्रतिनिधी)- पोलिसांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते. त्यामुळे पोलिसांना रक्षणकर्ता म्हटले जाते. पण काही घटना अशा असतात की रक्षकच भक्षक असल्यासारखे वाटते सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला जात आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओतील घटना उत्तर प्रदेशातील बागपत येथील बिनौली पोलीस ठाण्यात घडली आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक तक्रार करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला चापर मारताना दिसत आहेत. बिरजा राम असे पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. एकजण भाची हरवल्याची तक्रार केल्यानंतर चौकशीसाठी आपल्या कुटुंबासोबत बिनौली पोलिस स्टेशनच्या प्रभारींकडे गेला होता. या व्यक्तीची भाची चार दिवसांपासून बेपत्ता होती. तक्रारीनंतर काय झाले का ति सापडली का? याची माहिती घेण्यासाठी तो पोलीस ठाण्यात आला होता. मात्र त पोलीस निरीक्षकाने त्याला धीर देत माहिती देण्याएैवजी त्याच्या कानशिलात मारली. पण पोलिसाच्या या असभ्य वर्तनाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. अखेर बागपतचे एसपी नीरज कुमार यांनी याची दखल घेत,बिरजा राम यांची पोलीस लाईन्समधून बदली करण्याचे आदेश दिले आहेत.
बिरजा राम यांनी १७ सप्टेंबर रोजी पीडितेच्या कुटुंबासोबत अनैतिक वर्तन केले होते.जनतेची सेवा करण्यासाठी बसलेल्या पोलिसांनी पीडितेला चपराक मारली. असे अनुभव अनेकांना येत असतात त्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाल्याचे चित्र आहे.