
वाहतूकीचे नियम मोडणाऱ्याला पोलिसाने केली ‘अशी’ शिक्षा
शिक्षेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, तुम्हीही म्हणाल...
मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- सोशल मिडीया आज प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वाहतूक पोलीस नियमांचं भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना अनोख्या पद्धतीने समजूत घालत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक पोलिस अधिकारी लोकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन लग्नातील मंत्रोच्चार पद्धतीने करत आहे. लग्नातील फेटा नवरदेवाच्या डोक्यावर ज्या पद्धतीने चढवला जातो अगदी त्याच पद्धतीने पोलीसाने नियम मोडणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर हेल्मेट घातले. पण पुढच्या वेळी पकडले गेल्यावर पाच पट दंड आकारला जाईल असे देखील बजावले. या व्हिडिओला सोशल मिडीयावर नेटकरी चांगला प्रतिसाद देत असून या पोलीसाचे काैतुक करत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
इस भाई को इतनी इज़्ज़त से तो शादी में सेहरा भी नहीं पहनाया गया होगा😜 pic.twitter.com/UQn1gRFypz
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) September 9, 2022
आज देशात रस्ता अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहेत. यातील बरेच अपघात नियम मोडल्यामुळे होतात.त्यामुळे नियम पाळण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत असते.सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पोट धरून हसायला लावतात, तर काही व्हिडीओमधून बोध मिळतो. त्यामुळे या व्हिडिओला पसंती मिळत आहे.