Latest Marathi News
Ganesh J GIF

दहशत माजवणा-या दारुड्याची पोलीसांनी केली धुलाई

शिवीगाळ करत करायचा पैशांची मागणी,धुलाईचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

नाशिक दि २(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये दहशत माजवणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारे शहरात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी चांगला चोप दिला आहे. पोलिसांनी चोप दिल्याचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होऊ लागला आहे.

नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात ३१ डिसेंबरच्या सायंकाळी एक मद्यपी तरुण रस्त्यावर आरडाओरड करून आणि रस्त्यावर गाडी थांबवून शिवीगाळ करत पैसे मागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मद्यपी तरुण वाहनचालकांना अडवून शिवीगाळ करत आपल्याजवळ शस्त्र असल्याचा धाक दाखवत पादचारी तसेच वाहनचालकांकडून पैसे मागत होता. त्यामुळे या टवाळखोरांवर पोलीस कारवाई का करत नाहीत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. पण त्यानंतर अंबड पोलीसांनी त्या दारुड्याचा शोध घेत त्याला चांगलाच चोप दिला आहे.या धुलाईचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.पोलीसांनी दहशत माजवणाऱ्या या तरुणाला चोप देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते. अशात नववर्षाच्या स्वागतावेळी सार्वजनिक ठिकाणी जल्लोष साजरा करत असताना गालबोट लागू नये म्हणून पोलिसांकडून देखील शहरात नियोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीसांनी २०० पेक्षा जास्त तळीरामांवर कारवाई केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!