प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची कार्यकारीणी जाहीर
पुणे जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र ( बाप्पू ) काळभोर यांची निवड, इतर निवडी जाहीर
पुणे दि २(प्रतिनिधी)- “प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ” या पत्रकार संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र ( बाप्पू ) काळभोर यांची तर हवेली तालुका अध्यक्षपदी संदिप बोडके यांची निवड करण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सूनीलनाना जगताप यांनी लोणी काळभोर येथे केली आहे.
नुतन वर्षात कार्यकारीनी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी हवेली तालुका प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी सचिन सुंबे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत दुंडे व अमोल अडागळे, समन्वयकपदी अमोल भोसले, सरचिटणीस पदी जितेंद्र आव्हाळे आणि खजिनदारपदी श्रीनिवास पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बापू काळभोर व नवनिर्वाचित हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके यांनी केली. यावेळी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आल असुन त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनीही दिलेल्या न्याय देऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी तुळशीराम घुसाळकर, विजय काळभोर, सुनील तुपे, सुधीर कांबळे, विशाल कदम, हनुमंत चिकणेसह सदस्य पत्रकार उपस्थित होते.