या अभिनेत्रीने ‘त्या’ खास व्यक्तीसाठी केलेली पोस्ट चर्चेत
'ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी' म्हणत वेधले लक्ष, बघा कोण आहे लोकप्रिय जोडी
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने अमाप लोकप्रियता मिळवत लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नवीन आणि हटके विनोद हे या शोचे मुख्य आकर्षण आहे.
नुकतंच शिवालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती आणि प्रियदर्शनी ‘फुलराणी’ चित्रपटाचा एक प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसत आहे. याला शिवालीने हटके कॅप्शनही दिले आहे. या पोस्टमध्ये प्रियदर्शनीला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत शिवालीने लिहिलंय कि, ‘कुठून सुरवात करू समजत नाही आहे . चार वर्ष एकत्र काम करतोय, खूप जवळुन प्रवास पाहिला आहे तुझा, ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी करावी वाटतेय, खूप कौतुक खूप प्रेम खूप शुभेच्छा’ ही तर फक्त सुरुवात आहे. कोलीवाड्याची थ्री टाईम ब्युटीक्वीन ‘फुलराणी’ येतेय फक्त ३ दिवसात, २२ मार्चपासून जवळच्या चित्रपटगृहात!!” शिवालीच्या या पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरने ‘प्रिय शिवाली, इतक्या उत्साहाने माझ्याकडून रिल करुन घेतलीस! तिथेच प्रेम कळतंय तुझं! अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियदर्शिनीसोबतच अनेक कलाकार आणि नेटकाऱ्यानी देखील या दोघींच्या मैत्रीचे कौतुक केले आहे. सध्या शिवालीची ही पोस्ट आणि त्याचा रील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान ‘ती फुलराणी’ सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.