Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकच्या जुन्या सरकारपेक्षा भ्रष्ट

ओडीशातील रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अपघात रोखणारे ‘कवच’ कोठे गेले?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नाही, भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. अवकाळीच्या नुकसानीनंतर सरकारने विधानसभेत मदतीची घोषणा केली पण अद्याप ही मदत मिळालेली नाही. कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. कांद्याला अनुदान जाहीर केले पण जाचक अटीमुळे ही मदतही शेतकऱ्याला मिळाली नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि शिंदे सरकार मात्र मोठ मोठे इव्हेंट करण्यात मग्न आहे. शिंदे सरकारकडून लोकांना काय मिळाले तर केवळ पोकळ घोषणा मिळाल्या अशी परिस्थिती आहे. शिंदे-फडणवीस सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे, जनता भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो असे चित्र आहे, असे थोरात म्हणाले.

ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करु आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपाघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. ओडीशा अपघातीची नैतिक जबाबदारी म्हणून रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. शिवाय निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करत आहेत असेही थोरात म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!