Just another WordPress site

 ‘हर घर तिरंगा’ गाण्याची सोशल मिडीयावर धुम

सिनेसृष्टीतील 'या' दिग्गज मंडळींनी दिला स्वरसाज

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या एैतिहासिक घटनेला येत्या १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२१ पासून म्हणजेच मागील एका वर्षांपासून संपूर्ण देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहेत. आता स्वातंत्र्य दिनाला काहीच दिवस राहिले आहेत. त्यानिमित्त सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांकडून एक गीत तयार करण्यात आले आहे. या गीताला सोशल मिडीयावर जोरदार प्रतिसाद भेटत आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत उत्सवात जनतेसोबतच सेलिब्रेटी सुद्धा सहभागी झाले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर वरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ‘हर घर तिरंगा’ हे गाणं आहे. या गाण्याला जेष्ठ गायिका अशा भोसले, सोनू निगम,अमिताभ बच्चन यांच्या सह अनेक सेलिब्रिटींनी आवाज दिला आहे. त्यांच्यासोबतच या गाण्यात  अनुष्का शर्मा, विराट कोहली, अक्षय कुमार, प्रभास, कीर्ती सुरेश आणि नीरज चोप्रा हे सेलिब्रिटी झळकले आहेत. यावेळी त्यांनी देशवासीयांना तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

GIF Advt

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी ‘हर घर तिरंगा’ या अभियाना अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरात ध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. त्याला देखील प्रतिसाद मिळत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!