Latest Marathi News
Ganesh J GIF

या स्टार अभिनेत्याची मुलगी करणार या चित्रपटातुन डेब्यु

चित्रपटाचे पोस्टर शेअर दिली माहिती, इन्स्टा पोस्ट चर्चेत म्हणाली चित्रपटाची मी फार....

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड स्टार अभिनेता शाहरुख याची मुलगी सुहाना खान लवकरच बाॅलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खान ‘द आर्चीज’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून तिचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर हे देखील दिसणार आहे.

सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंवर तिच्या डेब्यू प्रोजेक्ट ‘द आर्चीज’चे नवीन पोस्टर शेअर केले. पोस्टर शेअर करताना, तिने लिहिले, ‘द आर्चीज’ नेटफ्लिक्स गँगला भेटा. लवकरच येत आहे, फक्त नेटफ्लिक्सवर! यापुर्वी सुहानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ‘द आर्चीज’च्या अधिकृत पेजवर टाकलेली पोस्ट देखील शेअर केली होती. तसेच तिने इंस्टाग्राम स्टोरीजवर रेड हार्ट इमोटिकॉनसह घोषणा करत शेअर करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते, ‘ बीआरबी कुर्सी पेटी बाध लीजिए टू गो टू रिव्हरडेल! ‘काही पॉप टेट्सचे शेक आणि बर्गर घ्या आणि द आर्चीज’ गँगला भेटण्याची तयारी करा, लवकरच नेटफ्लिक्सवर इनवर उपलब्ध होईल!’ या चित्रपटाची वाट चाहते फार आतुरतेने पाहत आहेत. हा चित्रपट १९६० च्या दशकाशी संबंधित तरुणाईचा आहे. झोया अख्तर आणि रीमा कागतीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या पोस्टमध्ये सुहाना खान ही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. सुहाना खान ही देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बाॅलिवूड पदार्पणाच्या अगोदरच सुहाना खान हिची तगडी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर आहे. पहिलीच वेळ आहे की, एकाच चित्रपटात तीनपेक्षाही अधिक स्टार किड्स बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले जाणार आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटीचे स्टार किड्स आणि त्यांचं बॉलीवूड मध्ये होणारे पदार्पण हे कायमच टीकाकारांच्या रडारवर आहे . या आधी आलिया भट, जान्हवी कपूर, सारा अली खान या स्टार किड्स च्या पदार्पणाच्या वेळी देखील नेपोटीझमचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला होता. गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांना नेपोटिझमचा मोठा फटका हा सातत्याने बसताना दिसत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!