चोर पावलांनी आला आणि शिकारीचा फडशा पाडला
पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत, शिकारीचा थरार सीसीटीव्हीत कैद, काय घडल?
पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर अनेकदा आढळून आला आहे. त्यामुळे अनेकदा बिबट्या आणि मनुष्य यांचा अनेकदा सामना झालेल्या घटनाही घडल्या आहेत. पण अशातच एक भयंकर घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातून समोर आली आहे. आळेफाटा येथील नगर – कल्याण महामार्गावर एका बिबट्याने पाळीव कुत्र्याची अलगदपणे शिकार केली आहे.
आळेफाटा परिसरातील कल्याण रोडवर सुदामा मुन्निलाल शर्मा यांचे ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स या नावाने रिपेअरिंगचे गॅरेज आहे. आपली कामे संपवून ते रात्री झोपले होते. त्यावेळी त्यांचा कुत्राही त्या ठिकाणी झोपला होता. मध्यरात्री तिथे बिबट्या वाहनांच्या आडोशाने दबक्या पावलांनी आला, आणि त्याने कुत्र्यावर झडप घातली. कुत्र्याचा आवाज आल्याने सुधाकरला जाग आली. सुधाकर याच्या डोळ्यादेखत बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आणि शिकार तोंडात धरून बिबट्या घटनास्थळवरून पसार झाला. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यापुर्वी या ठिकाणी अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ला करुन शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता परिसरातील नागरिकांनी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी बिबट्याने सहा फुटी सुरक्षा भिंतीवरुन उडी घेत, पाळीव कुत्र्याची शिकार केली होती. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. ३० एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली होती. पुण्याच्या मंचरमध्ये ही घटना होती. पण नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.