Latest Marathi News
Ganesh J GIF

डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार

खा. सुळेंच्या प्रयत्नांना यश: जलवाहिनीसाठी महापालिकेकडून निधी मंजूर

पुणे दि ११(प्रतिनिधी)-  धायरी येथील डिएसके विश्व सोसायटीसाठीसाठी पुणे महापालिकेकडून सहा इंची २०० मीटर लांबीची स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करण्यात आली असून त्यासाठी बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आभार मानले आहेत.

खासदार सुळे यांच्या सूचनेनुसार डीएसके विश्व सोसायटीचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी येथील मेघमल्हार सोसायटीचे चेअरमन शीतल कामते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण हे सातत्याने पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करण्यात आली आहे. या वाहिनीसाठी निधी देखील मंजूर झाला असून लवकरच येथील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे सुळे यांनी म्हटले आहे.

याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकौंटवरून माहिती दिली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे आभारही मानले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!