Latest Marathi News
Ganesh J GIF

बंद खोलीत पत्नीचा काटा काढला, गोळीबाराचा आवाजानंतर पुतण्या आला अन् जीवाला मुकला !

पुणे –  पुणे शहरात सोमवारी पहाटे दुर्देवी घटना घडली. बड्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नोती मिळाली होती.

सोमवारी पहाटे त्यांनी आपल्या घरातच कहर केला. आधी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेत तिघांचामृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.

नुकतेच मिळाले होते प्रमोशन

भरत गायकवाड (वय ५७) यांना नुकतचे वरिष्ठ पोलीस निरक्षकपदावरुन एसीपी म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली होती. ते अमरावती येथे कार्यरत होते. त्यांचे कुटुंब पुण्यात राहत होते. ते अमरावतीवरुन सुट्टी घेऊन पुण्यात आले होते. सोमवारी पहाटे चार वाजता त्यांनी पत्नी मोनी हिला गोळी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकून पुतण्या दीपक धावत आला. त्यानंतर त्यालाही गोळी मारली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.

मुलगा अन् आईला खोलीच्या बाहेर काढले

भरत गायकवाड यांनी पत्नी मोनी गायकवाडवर (४४)  गोळी झाडली. त्यापूर्वी त्यांनी त्यांची आई आणि मुलगा सुहास यांना खोलीतून बाहेर काढले होते. परंतु गोळीबाराचा आवाज ऐकून आलेल्या पुतण्यालाही संपवले. या घटनेची माहिती सुहास गायकवाड याने पोलिसांना दिली. त्यानंतर तिघांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

पोलिसांनी केला तपास सुरु

तीन जणांचा मृत्यूचा प्रकार बाणेरमध्ये घडला. त्यानंतर पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा केला. भरत गायकवाड यांनी गोळ्या लायसन्स रिव्हॉल्वरमधून झाडल्या की त्यासाठी दुसरी पिस्तूल वापरली, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!