Latest Marathi News
Ganesh J GIF

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला खुपतात पतीच्या ‘या’ गोष्टी

सोशल मिडीयावर त्या व्हिडिओची जोरदार चर्चा, त्या गोष्टीमुळे पुन्हा झाल्या ट्रोल, म्हणाल्या मला ती गोष्ट..

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्या आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे आणि गाण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांच्या खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांआधी झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात काही व्हीडिओ दाखवले जातात. यावेळी अमृता फडणवीस यांचा व्हीडिओ दाखवण्यात आला. यात अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यातील खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या म्हणाल्या “मला देवेंद्रजींबद्दल काय खुपतं? याचं उत्तर मी मजेशीर देऊ शकले असते, देवेंद्रजी तुम्ही लोकसेवेत खूप व्यग्र आहात, पण मला वाटतं की तुम्ही स्वतःसाठी आणि महाराष्ट्रासाठीही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कितीही वाजता झोपणं, अवेळी झोपणं, कमी झोप घेणं, जिथे जे मिळेल ते खाणं, व्यायामासाठी वेळ न मिळणं या गोष्टी दीर्घकाळासाठी तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.” यानंतर फडणवीस मिश्किल हसले आणि म्हणाले “हे लेक्चर मी नेहमी ऐकतो. मी अमृताला नेहमी सांगतो की मी लवकरच व्यायाम वगैरे सुरु करतो. पण तसं होत नाही आणि जरी तो सुरु केला तरी फारकाळ तो टिकत नाही.” तसेच अमृता फडणवीस यांच्या रोखठोक स्वभावाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आम्ही पहिल्या दिवसापासूनच असं ठरवलं होतं की तिने तिचं जीवन जगायचं आणि मी माझं जीवन जगणार. व्यक्ती म्हणून तिची काही मतं आहेत. ती प्रत्येकवेळी मला पटतात असं नाही, पण तो तिचा अधिकार आहे. त्यामुळे मी तिला आडकाठी करत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एक ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. अमृता फडणवीसांना कलाक्षेत्राची आवड असून त्या उत्तम गायिका व समाजसेविकाही आहेत. त्या सोशल मिडीयावर अनेकदा ट्रोलर्सच्या निशान्यावर असतात. नुकत्याच त्या आपल्या ड्रेसमुळे ट्रोलर्सच्या निशान्यावर आल्या होत्या.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!