Latest Marathi News
Ganesh J GIF

मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून महिलेने केली पतीची हत्या

पुणे – पुणे शहरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची हत्या केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा खुलासा करत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, मुलीच्या प्रेमसंबंधावरून पती आणि पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होता. याच कारणाने महिलेने पतीची हत्या करण्याचा प्लान केला.

मीडिया रिपोर्टनुसार, पुण्याच्या शिक्रापूरमद्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचं शहरात राहणाऱ्या एका तरूणासोबत अफेअर होतं. पण दोघांचं नातं मुलीचे वडी जॉन्सन लोबो यांना पसंत नव्हतं. याच कारणाने आपल्या मुलीच्या प्रेमात आडकाठी ठरणाऱ्या आपल्या पतीची हत्या करण्याचा प्लान केला आणि मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून त्याची हत्या केली.

पोलिसांनी सांगितलं की, मुलीचे वडील जॉन्सन आणि आईमध्ये मुलीच्या अफेअरवरून नेहमीच वाद होत होता. अशात जॉन्सनच्या पत्नी वेबसीरीज बघून पतीच्या हत्येचा प्लान तयार केला. जॉन्सनच्या पत्नीने मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून एका हत्याराने ३० मे रोजी पतीची हत्या केली. हत्येनंतर त्यांनी मृतदेह घरातच ठेवला आणि त्याची विल्हेवाट लावण्याची ते संधी शोधत होते. ३१  मे रोजी त्यांनी मृतदेह कारमध्ये ठेवला आणि अहमदनगर रस्त्यावरील एका नाल्यात फेकला. त्यानंतर त्यावर पेट्रोल टाकून जाळला.

दरम्यान लोकांना अर्धवट जळालेला मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेहाची माहिती मिळवण्यासाठी चौकशी केली. ग्रामीण पोलिसांनी यासाठी २३० सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले आणि त्यात त्यांना धारेदोरे सापडले. घटनेचा छडा लावत पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या मुलीच्या बॉयफ्रेंडला अटक केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!