मुंबई : एका अल्पवयीन मुलाने ४३ वर्षीय व्यक्तीचा स्क्रू ड्रायव्हरने वार करून खून केल्याची घटना घडली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. ही घटना कांदिवली येथे घडली आहे. आईवरून चिडवल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अब्दुल रहीम असे मृत व्यक्तीचे नाव असून तो ४३ वर्षांचा होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम हा ऑटोरिक्षा चालक होता. तो, त्याची ७५ वर्षीय आई आणि दोन मुलांसोबत चाळीत राहत होता. तो नियमित दारू प्यायचा आणि त्याला इतर व्यसनेही होती. त्याच्या व्यसनामुळे, चाळीतील रहिवाशांनी त्याच्यावर अनेकदा कमेंट्स केल्या आणि त्याचे त्यांच्याशी वाद झाले. रहिमच्या आईनेही त्याला या वागण्याविरुद्ध इशारा दिला होता, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपी मुलगा हा त्याच चाळीत राहणारा असून मलिक याने आरोपीला त्याच्या आईवरून चिडवले होते. त्यामुळे रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याने रहीमच्या मानेखाली, उजव्या काखेत आणि डोक्याच्या मागील बाजूस स्क्रू ड्रायव्हरने वार केले. ही माहिती मिळताच पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी मलिकला रुग्णालयात दाखल केले. रहीमवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते, मात्र सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
आपल्या मुलाला रुग्णालयात भेटल्यानंतर, रहिमची आई मुमताज मलिक यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात आली असता, रहीमने अनेक वेळा त्याला चिडवल्या तो म्हणाला. आणि त्याच रागातून त्याने रहीमवर स्क्रू ड्रायव्हरने वार केल्याचे सांगितले, असे पोलिस म्हणाले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर भादंवि कलम ३०२ (हत्या) नुसार गुन्हा दाखल केला. नंतर त्या अल्पवयीन मुलाला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आणि नंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले.