Latest Marathi News
Ganesh J GIF

महिला टेरेसवर कपडे काढण्यासाठी गेली आणि उडालीच

आजारी वडिलांना भेटायला आलेल्या राणीसोबत टेरेसवर काय घडले, त्यामुळे आता मृत्यूबरोबर देत आहे झुंज

नाशिक दि ७(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. घराच्या टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा जोरदार शॉक लागला आहे. यात त्या भाजल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यानंतर महावितरणाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

राणी दशरथ चव्हाण असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. मनमाडच्या असलेल्या राणी आजारी वडिलांना भेटण्यासाठी सातपूरला आल्या होत्या.धुतलेले कपडे सुकत घालण्यासाठी राणी चव्हाण टेरेसवर गेल्या होत्या. यावेळी त्यांचा अचानक टेरेसवरून जाणाऱ्या एमएसईबीच्या वायरचा शॉक लागला. यामुळे त्या पाच फुट लांब फेकल्या गेल्या. परिसरातील नागरिकांना आणि घरातील सदस्यांना मोठा आवाज आल्याने घरातील सर्व मंडळी बाहेर आले. त्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना तात्काळ अशोक नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या राणी चव्हाण यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान महावितरणच्या उघड्या तारा धोकादायक बनल्या आहेत. अनेक दिवसांपासून याबाबत तक्रारी एमएससीबी च्या विभागाला करण्यात आल्या आहेत. पण महावितरण कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे समोर आले आहे.

महावितरणचा भोंगळ कारभार अजून किती जणांचे अपघात घडल्यानंतर जागे होणार? असा सवाल परिसरातील संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत. तसेच राणी या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांना शासकीय नियमानुसार मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!