Latest Marathi News
Ganesh J GIF

ज्योती मोर्य प्रकरणाची धास्ती पतीने थांबवले पत्नीचे शिक्षण

सोशल मिडीयावर 'बेटी पढाव, पत्नी नही'चा ट्रेड, ज्योती मोर्यने खरच पतीला धोका दिला?, प्रकरण काय?

दिल्ली दि ७ (प्रतिनिधी)- सोशल मीडियावर एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचा पती आलोक यांच्यातील वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्योती आणि अधिकारी बनल्यानंतर धोका देत घटस्फोटासाठी दबाव टाकल्याचा दावा त्यांचे पती आलोक यांनी केला आहे. सध्या या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पण आता याचा फटका इतर शिक्षण घेणाऱ्या महिलांना होताना दिसत आहे. बिहारमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे.

बिहारमधील बक्सर येथील एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये पतीने पत्नीला पुढे शिकवण्यास नकार दिला आहे. तसेच त्याने पत्नीला परत घरी येण्यास सांगितले आहे. ज्योती यांचे पती आलोक यांनी पत्नीला शिकवून मोठे अधिकारी बनवले, पण ज्योती यांनी अधिकारी बनल्यानंतर पतीकडे घटस्फोटाची मागणी केली. त्याचबरोबर तिचे एका व्यक्तीबरोबर प्रेमप्रकरणात सुरू असल्याचा आरोप पतीने केला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. पण हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मिडीयावर मुलीला शिकवा, बायकोला नाही असा संदेश व्हायरल होत आहेत. याच भीतीतुन एका व्यक्तीने आपल्या महिलेला शिक्षण थांबवून परत येण्यास सांगितले आहे. संबंधित महिला बीपीएससीची तयारी करत असून लग्नानंतर नवऱ्याने तिला शिक्षणासाठी मदत केली होती, पण आता तो तिला पुढे शिकविण्यास नकार देत आहे. त्यामुळे पत्नीने पोलीसांकडे धाव घेत मदतीची मागणी केली आहे. “मी पेट्रोल पंपावर काम करतो, मला ८ ते १० हजार पगार मिळतो, या पैशातून मी माझ्या पत्नीचे शिक्षण पूर्ण केले. शिवाय पुढचे शिक्षणही चालू ठेवले होते, पण आता पुढे शिकवायचे नाही. कारण आलोक मौर्यासोबत जे घडले ते माझ्याबाबतीत घडेल अशी भीती वाटत असल्याचे पतीने सांगितले आहे. तर मुली सारख्या नसतात, मला अभ्यास करायचा असून आता पोलिसांनी मला अभ्यासासाठी मदत करावी अशी मागणी महिलेने केली आहे. सध्या या प्रकरणामुळे पोलीस मात्र गोंधळात पडले आहेत.

झारखंडमध्येही ज्योती मोर्य सारखा प्रकार घडला आहे. येथे पतीने मोलमजुरी करून पत्नीला शिकवलं, तिला नोकरीला लावलं. मात्र यानंतर तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला लागताच महिला फरार झाली आहे. सध्या पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!