Latest Marathi News
Ganesh J GIF

जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांनी केली ‘त्याची’ धुलाई

महिलांच्या मारहणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, महिला का झाल्या आक्रमक, बघा नेमके काय घडले?

बुलढाणा दि ४(प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यात आज एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महिलांना एका व्यक्तीची चांगलीच धुलाई केली. ही धुलाई इतकी दमदार होती की, त्या व्यक्तीने तेथून पळ काढला या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

धुलाई करणाऱ्या महिलांची नावे मंगला निकम आणि अनिता काळे अशी आहेत. मंगला निकम ह्या भालेगाव येथील उपसरपंच आहेत. तर अनिता काळे ह्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यांनी संतोष चांदणे नावाच्या व्यक्तीची जिल्हाधिकारी कार्यालयात धुलाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतोष चांदणे याने भालेगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली आहे. पण यामागे चांदणे धमकावतो असा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनीविरोधात तक्रार करायची आणि ती तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्याकडून पैसे उकाळण्याचे काम संतोष करायचा. निकम आणि काळे यांनाही त्याने तक्रार मागे घेण्यासाठी एक लाख रुपये देण्याची मागणी केली होती. या दोघींनी पैसे देण्यास नकार दिल्याने चांदणेने त्या दोघींना शिवीगाळ केली. त्यामुळे महिलांना राग अनावर झाला. या महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संतोष चांदणे याची चपलेने धुलाई केली. या मारहाणीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ झाला होता. या गोंधळाचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पण या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. संबंधित व्यक्तीने अनेकांना धमकावून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संतोष चांदने हा व्यक्ती माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. ज्या कायद्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे. त्याचा वापर हा खंडणीसाठी करत होता. या घटनांना जरब बसावा यासाठी महिला उपसरपंच मंगला निकम आणि महिला सदस्य अनिता काळे यांनी मारहाण केली असे सांगितले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!