दौंड, दि. २३ (प्रतिनिधी) – दौंड शहरातील दळणवळणासाठी अतिशय महत्वाची असणाऱ्या कुरकुंभ मोरीचे काम पूर्ण झाले असून लवकरच ही मोरी वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. या मोरीचे उदघाटन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निमंत्रण दिले.सुळे यांनी आज आपल्या दौंड शहर दौऱ्यादरम्यान कुरकुंभ मोरीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी रेल्वेचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुरकुंभ मोरीचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी स्थानिक पातळीपासून केंद्रीय पातळीपर्यंत खासदार सुप्रिया सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने देखील या कामासाठी सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करुन दिला. त्याबद्दल सुळे यांनी तत्कालीन सरकारचे आभार मानले आहेत.
रेल्वे मंत्रालय तसेच रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे या मोरीचे काम वेळेत सुरू होऊ शकले. त्यानंतर मोरीचे काम प्रत्यक्ष सुरु झाल्यानंतर येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील मोलाचे योगदान दिले. याबद्दल त्यांचेही सुळे यांनी आभार मानले आहेत. हे काम आता पुर्ण झाले असून या मोरीचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी वेळ द्यावा, असे ट्विट सुळे यांनी केले आहे. ‘आपल्या सहकार्यामुळे हे काम मार्गी लागले असून आपल्या प्रमुख उपस्थितीत कुरकुंभ मोरीचे उद्घाटन व्हावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. आपण या विनंतीला मान द्याल असा आम्हाला विश्वास आहे’, असे सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड शहरातील दळणवळणासाठी अतिशय महत्वाची असणाऱ्या कुरकुंभ मोरीचे काम आता पुर्ण झाले आहे. याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रेल्वेचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. pic.twitter.com/FoWpxxoWPh
— Supriya Sule (@supriya_sule) August 23, 2022