
…तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद आहे
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला विधान, मुंडेंच्या मनात चाललंय काय?, भाजपाला दिला हा इशारा?
पुणे – मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे, असे मोठे विधान भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. यामुळे वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
नाशिकच्या सिडको परिसरामध्ये वारकरी भावनांच्या लोकार्पण सोहळा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. तसेच मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या जन्मापासून काम केले आणि तो पक्ष खऱ्या अर्थाने त्यांनीच उभा केला, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. महाराष्ट्रात भाजप रुजविण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनीच केले, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकले. तसेच पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते, लोक गुणांचा स्वीकार करतात, लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात, त्यामुळे गुणांचा वारसा स्वीकारून ते माझ्याशी जोडले गेले, असे पंकजा मंडे म्हणाल्या आहेत.
पंकजा मुंडे २०१९ च्या पराभवानंतर पक्षावर नाराज होत्या. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्तही केली होती. त्यावेळी भाजपाने त्यांचे राजकीय पुनर्वसन न केल्याने मुंडे समर्थक देखील नाराज होते. पण अखेर २०२४ साली विधान परिषदेत संधी देत पक्षाने त्यांचे पुनर्वसन तर केलेच शिवाय मंत्रीपदही दिले.